Sunday, June 26, 2011

कडेलोटाच्या सीमेवर
वेदनेच्या लाटेवर
निखा-यांच्या वाटेवर
कोणीच नसतं आपल्याबरोबर..

नैराश्याच्या बेटावर
काळोखाच्या थांगावर
विस्कटलेल्या रंगावर
कोणीच नसतं आपल्याबरोबर...

विरक्तीच्या टोकावर
अपयशाच्या गर्तेवर
धगधगणा-या चितेवर
कोणीच नसतं आपल्याबरोबर

No comments:

Post a Comment